Accident : यवतमाळमध्ये भयानक अपघात; ST बस अर्धी कापली गेली

Yavatmal Accident News : एसटी बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसची अर्धी बाजू कापली गेली आहे. 

Updated: Mar 22, 2023, 04:40 PM IST
 Accident :  यवतमाळमध्ये भयानक अपघात; ST बस अर्धी कापली गेली title=

Yavatmal Accident News :  मराठी नव वर्षाच्या सुरुवातीलच यवतमाळमध्ये (Yavatmal) भयानक अपघात घडला आहे. या अपघातात ST बस अर्धी कापली गेली आहे. अपघाताचे फोटो पाहूनही अंगावर काटा येत आहे. या अपघातात दोघे जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे (Accident News).  

यवतमाळच्या कामठवाडा जवळ हा अपघाता झाला आहे.  एसटी बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसची अर्धी बाजू कापली गेली आहे. या अपघातात दोन प्रवासी मुलींचा मृत्यू झाला आहे. तर, 15 प्रवासी जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये 8 वर्षीय पायल गणेश कीरसान आणि 11 वर्षीय पल्लवी विनोद भरडीकर यांचा समावेश आहे. तर, आणखी एका प्रवाशा प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

अपघात एवढा भीषण होता की बोलेरो वाहनावरील पाईप बसमधील खिडक्यामधून आत घुसले. या मुळे बसचा अर्धा भाग कापला गेला.  पाईप थेट बस मध्ये घुसल्याने बसमध्ये बसलेले  प्रवासी जखमी झाले.  घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, लाडखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

समृद्धी महामार्ग बनतोय अपघात मार्ग

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात झाले  आहेत. यामुळे समृद्धी महामार्ग अपघात मार्ग बनतोय अशी भिती व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपायोजना आखण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर आठ समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत.