नागपुरात आगीत 10 दुचाकी जळून खाक

नागपूर शहरात आग लागून दहा दुचाकी जळून खाक झाल्यात. वर्मा ले आऊटमधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  

Updated: Dec 29, 2018, 05:32 PM IST
नागपुरात आगीत 10 दुचाकी जळून खाक title=

नागपूर : शहरात आग लागून दहा दुचाकी जळून खाक झाल्यात. वर्मा ले आऊटमधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. वर्मा ले आऊट येथील बजाज अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये शुक्रवारी पहाटे आग लागली होती. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्यचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी याबाबत अजूनही तपास सुरु आहे. 

अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकींना अचानक आग लागली. क्षणातच आगीचे स्वरुप मोठे झाले होते. तिथे ठेवलेल्या दहा दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात. सुदैवाने इमारतीच्या वरच्या माळ्यावर राहणारे कुटुंब वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र आगीत इमारतीचेही नुकसान झाले आहे. 

दरम्यान, दुचाकी जळल्याच्या या घटनेनंतर बजाज अपार्टमेंटमध्ये रहात असलेली सहा कुटुंब आणि आजबाजूच्या परिसरातील नागरिक प्रचंड दहशती खाली आहेत. मात्र, नेमके आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.