तेजस एक्सप्रेस विषबाधा प्रकरण: कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस

तेजस एक्स्प्रेसमध्ये 26 प्रवाशांना विषबाधेचा त्रास झाला. याप्रकरणी कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. त्याचप्रमाणे दोषी आढल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचं आश्वासनं रेल्वे प्रशासनानं दिलंय. 

Updated: Oct 15, 2017, 10:10 PM IST
 title=

चिपळूण : तेजस एक्स्प्रेसमध्ये 26 प्रवाशांना विषबाधेचा त्रास झाला. याप्रकरणी कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. त्याचप्रमाणे दोषी आढल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचं आश्वासनं रेल्वे प्रशासनानं दिलंय. 

करमाळीहून मुंबईच्या दिशेने तेजस एक्सप्रेस निघाली होती. मात्र, रत्नागिरी स्थानक सोडल्यानंतर यातील काही प्रवाशांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ट्रेन चिपळूण स्थानकात आल्यानंतर थांबण्यात आली होती. यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या एक-एक करत उलटीचा त्रास होत असलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आलं. ट्रेनमधील बिर्याणी खाल्यामुळे त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.