सोनसाखळी चोरांच्या बंदोबस्ताचे पोलिसांसमोर आव्हान

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसासमोर आहे. 

Updated: Oct 15, 2017, 09:17 PM IST
सोनसाखळी चोरांच्या बंदोबस्ताचे पोलिसांसमोर आव्हान title=

नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसासमोर आहे. 

दिवाळी निमित्ताने बाजारात लगबग बघायला मिळत असून खरेदीसाठी महिला वर्ग घराबाहेर पडतो त्या काळात सोनसाखळी चोर सक्रीय होत असून महिलांच्या दागिन्यावर त्यांची नजर असते.. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दिवाळी निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये अशा सूचना करण्यात आलायत. दरवर्षी दिवाळीत चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी आधीपासूनच उपाययोजना सुरु केलीय.