सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रु; व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजित पवार?

Khupte Tithe Gupte : अजित पवारांवरती बायोपिक निघालाच, तर कुठल्या अभिनेत्यानं अजित पवारांची भूमिका करावी, असा प्रश्न झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी डॉ. निलेश साबळे यांचे नाव घेतले. 

वनिता कांबळे | Updated: Mar 6, 2024, 12:22 AM IST
सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रु;  व्हिडिओ पाहून  काय म्हणाले अजित पवार? title=

Ajit Pawar Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिलीच विशेष मुलाखत झी २४ तासला दिली.   ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी मुलाखत घेतली. यावेळी अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांचा डोळ्यात अश्रु असेलला व्हिडिओ दाखवण्यात आला. यावर अजित पवार यांनी भावानिक न होता अतिशय वास्तवादी प्रतिक्रिया दिली. 

काही दिवसांपूर्वी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात  खासदार  सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी हजेरी लावली होती. यावेळी  सुप्रिया सुळे आणि अजित पवार  यांचे काही फोटो स्क्रिनवर त्यांना दाखवण्यात आले. हे फोटो पाहून सुप्रिया सुळे भावनिक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. सुप्रिया सुळे यांचा भावनिक झालेला व्हिडिओ अवधूत गुप्ते यांनी याच कार्यक्रममात अजित पवार यांना दाखवला.या व्हिडिओवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजित पवार

अवधुत गुप्ते यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांचा रडतानाचा व्हिडीओ दाखवला, त्यावेळी मी राजकीय भूमिका घेतली आहे. आमच्या कुटूंबात व्यक्तीस्वातंत्र्य आहे. आम्हाला आत्ताच्या घडीला जी विचारधारा मान्य आहे, त्यावर आम्ही अंमलबजावणी केली. आम्ही काही वेगळं काही केलं नाही, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. राजकीय भूमिका वेगळी आणि घरगुती आमि नाते संबध वेगळे. आमचं पूर्ण घराण शेतकरी कामगार पक्षाचे. संपूर्ण कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचे काम करत होते. फक्त घरातील एक व्यक्ती काँग्रेस पक्षासाठी काम करत होते. कारण त्यांना त्यांचे नेतृत्व पटले होते. आम्हाला लहानपणापासूनच राजकीय स्वातंत्र्य दिले गेले. आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेवून भाजप सोबत गेलो आहे. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत देखील जाऊ शकतो. भाजप आणि शिवसेना यांच्या विचारधारेत फार फरक नाही.  सर्व आठवणी या वेगळ्या काळातील आहेत असं अजित पवार म्हणाले.