'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल

Supriya Sule News :  राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2023, 02:00 PM IST
'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल title=

Supriya Sule News : घराणेशाही आहेच आणि त्याचा रास्त अभिमान आहे. असे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ( Maharashtra Political News) 'संसदरत्न पुरस्कार' पवारांची कन्या म्हणून नाही तर कामगिरीमुळे मिळाला, असे सुळे म्हणाल्या. अजितदादांकडे राज्याचं महत्त्वाचे असं विरोधी पक्षनेतेपद आहे, असेही त्या म्हणाल्या.  त्याचवेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे. मग राज्यातील सरकार काय करत आहे, असा सवाल करत राज्यातील वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गांधी भवनात गांधी स्मारकाला भेट देऊन गांधींना अभिवादन केले. सुप्रिया सुळे यांच्याकडून नागरिकांच्या, कलाकारांच्या, उद्योगपतींच्या, भेटीगाठीला सुरुवात झाली आहे. गांधी दर्शन शिबिराला भेट दिल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच राज्य सरकारला धारेवर धरले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा लोकशाही विचारांवर चालणारा पक्ष आहे. घराणेशाहीचा आरोप करण्याचा अधिकार विरोधकांना नाही. अजित पवार हे राज्यातील विरोधी पक्ष नेता आहेत. ही जागा मुख्यमंत्री यांच्या बरोबरप्रमाणे सारखी असते. घराणेशाही आहे ना आणि मला सार्थ अभिमान आहे की, मी शरद पवार यांची मुलगी आहे. एक बोट जेव्हा माझ्याकडे येते, तेव्हा बाकीचे बोट त्यांच्याकडे जातात. त्यामुळे करु दे त्यांना आरोप. मी संसदेत घराणेशाहीवर बोलले आहे. त्याबाबत उत्तर दिले आहे. आज  देशात विरोधी पक्ष हे लोक संपावायला चालले आहेत. विरोधी पक्ष असलाच पाहिजे. संसदेत लोकशाहीचा अपमान होत आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

मी पक्षाचे सगळे कार्यकर्ते, नेते, पवारसाहेब यांचे आभार मानते की एवढा विश्वास माझ्यावर टाकला.  मी प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे.  मी राज्यात अजितदादा, भुजबळ साहेब यांना रिपोर्ट करणार आहे. लोकशाहीचा पक्ष आहे यात रिपोर्टिंग करण्याचा विषयच येत नाही. यावेळी त्यांनी मीडियाला सुनावले. तुम्हाला गॉसिप करायचे आहे, पण मला सत्य मान्य आहे. हा पक्ष लॉबिंगने चालत नाही. मी महिला खासदार नाही तर मी एक खासदार आहे. महिला पुरुष हा वाद येत नाही. देशात काम करत असताना महिला, पुरुष सगळ्यांच्याबाबत विचार करत असतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतांचा अधिकार दिला, फुले यांनी शिक्षणाचा अधिकार दिला हे पुरुष होते. त्यामुळे महिला आणि पुरुष यांच्यामधील ही लढाई नाही. मी सगळ्यांचेच आभार मानते की एवढा विश्वास माझ्यावर टाकला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.