राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडसेंचा उमाळा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रांना सवाल

हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं नंदूरबार जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जोरदार उमाळा आलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 19, 2018, 04:30 PM IST
राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडसेंचा उमाळा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रांना सवाल title=

नंदूरबार : हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं नंदूरबार जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जोरदार उमाळा आलाय. 

खडसेंच्या राजीनाम्या मागे नेमकं काय गोलमाल आहे? ज्यांच्यामुळं सत्ता आली, त्या खडसेंना बाजूला का सारले गेले? असे सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेत. शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खडसे समर्थक असल्यानं, त्यांना सहानुभूती दाखवताना सुप्रिया सुळेंनी एकाच बाणात अनेक शिकार केल्या.