सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 

नेहा चौधरी | Updated: Sep 22, 2024, 07:49 AM IST
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण  title=
Baramati maharashtra Politics

Supriya Sule and Yugendra Pawar News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसलीय. उमेदवार जाहीर करण्यापासून आपल्या भावी मुख्यमंत्री कोण यांच्या चर्चा रंगल्या आहेत. उमेदवार ठरवण्यापासून दौरे आणि बैठकींचं सत्र सुरु आहे. अशात बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापलंय. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) या भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार ( Yugendra Pawar) आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. विधानसभा निवडणूक मतदानापूर्वीच बारामतीत अशा आशयाचे बॅनर लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. (Supriya Sule Chief Minister and Ugrendra Pawar MLA banners flashed in Baramati maharashtra Politics )

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून तर युवा नेते युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेले आहेत. बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुप च्या वतीने अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x