दहावी बारावीच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, अशी द्यावी लागेल परीक्षा

मुलांनो अभ्यासाला लागा....ऑनलाईन परीक्षा होणार की नाही? पाहा कोर्टानं काय दिलाय निर्णय (cancel exam 2022)

Updated: Feb 23, 2022, 02:37 PM IST
दहावी बारावीच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, अशी द्यावी लागेल परीक्षा title=

मुंबई : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. ऑफलाईन परीक्षे संदर्भात आता एक महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण चित्रच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ऑनलाइन कराव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांत झाली. मात्र या सगळ्यावर आता सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाईनच होणार आहे. 

सुप्रीम कोर्टात ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं निर्णय  दिला आहे. दहवी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे. 

सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय स्टेट बोर्ड, CBSE, ICSE आणि National Institute of Open Schooling (NIOS) या सर्वांसाठी लागू करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या याचिका या विद्यार्थ्यांना चुकीच्या आशा दाखवत असल्याची फटकारही सुप्रीम कोर्टानं लगावली.