Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Updated: Feb 23, 2022, 02:35 PM IST
Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया...   title=

मुंबई : नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथील बैलगाडा शर्यतीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र, नवाब मलिक यांची बातमी येऊन धडकताच गृहमंत्री वळसे पाटील यांनी तालुक्यातील सर्व दौरे रद्द करुन तातडीने मुंबईला रवाना झाले.

मुंबईत आल्यावर त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नवाब मिल्क यांच्या चौकशीनंतर आघाडी सरकार अधिकच सतर्क झाले असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची आज भेटीची शक्यता आहे. 

यांनतर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून या कारवाया सुरु आहेत. राजकारणासाठी जात, धर्म याचा वापर केला जाऊ नये. नवाब मलिक यांनी अनेक गोष्टीना वाचा फोडली आहे. त्यामुळे ही कारवाई झालेली दिसते, असे त्यांनी सांगितले. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्च नंतर सरकार पडेल असे विधान केलंय. मात्र, सरकार अडचणीत आहे असे मला वाटत  नाही. सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आघाडी सरकार आमचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय तपास यंत्रणा एखाद्याला टार्गेट करून त्रास देण्याचे काम करत आहे. अनेक लोकांना अनेक प्रकारचा त्रास दिला जातोय. केंद्र सरकार या केंद्रीय यंत्रणाचा वापर सूडबुद्धीने करत असल्याचे दिसत आहे. मलिक यांना नोटीस देणे गरजेचे होते. मात्र, ईडी टीमने तसे काही केले नाही,असे त्यांनी सांगितले.