हुरर्रे! राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना या तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  2 मे ते 12 जून यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे

Updated: Apr 12, 2022, 09:14 AM IST
हुरर्रे! राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना या तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर title=

मुंबई :  राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  2 मे ते 12 जून यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. शाळा पुन्हा 13 जूनला भरवण्यात येणार आहे. तर विदर्भातील शाळांना 27 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षांचे निकाल सुटीच्या काळात घोषित करता येणार आहेत. 

शाळेच्या वेळेत बदल

उन्हाचे चटके वाढल्याने नागपुरात शाळा आता सकाळी साडेदहा पर्यंत सुरू राहणार आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे नवे आदेश काढलेत. गेल्या आठवड्याभरात नागपुरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला. त्यामुळे वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठाची स्थापना

ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी आता राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणारे आहे. कोरोनाकाळात विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. मात्र आता त्यांना शिस्तबद्ध स्वरुप दिलं जाणार आहे. या विद्यापीठात विविध शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम जोडले जाणार आहेत. शिवाय परीक्षेत होणारे गैरप्रकार, गुणवत्ता यावरही देखरेख ठेवली जाणार आहे.