'आमच्या हयातीत एकदा तरी...' महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुमीत राघवनची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती

सुमीत राघवनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Updated: Jul 27, 2022, 05:16 PM IST
'आमच्या हयातीत एकदा तरी...' महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुमीत राघवनची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती title=

मुंबई : दरवर्षी खड्ड्यांमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. नुकतचं घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्यांमुळे पहिला बळी गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्याकरिता सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर खड्डे भरण्याचं काम सुरू झालं. दरम्यान, मराठी अभिनेता सुमीत राघवननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग केले आहे. सुमीतचं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

सुमीतनं एका नेटकऱ्याचे ट्वीट रिट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये नेटकरी म्हणाला, ‘संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडून देण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. दिलासा द्या.’ 

नेटकऱ्याचे हे ट्वीट सुमीत म्हणाला, 'अनुमोदन. सीएमओ महाराष्ट्र आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो." या ट्विटमध्ये सुमीतने मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग केलं आहे. 

दरम्यान, या आधी राघवननं मुंबई पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. या व्हिडीओत मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने बस चालवताना दिसतो. हा व्हिडीओ शेअर करत सुमीत म्हणाला, 'कृपा करून "भीती" निर्माण होईल ड्रायव्हर्सच्या मनात असं काहीतरी करा. हे अती झालंय. तुमच्याबद्दल ह्यांच्या मनात आदर नाहीच आहे हे उघड आहे,भीती देखील नाही आहे. तर निदान भीती निर्माण करा कारण त्याशिवाय काही खरं नाही..' यासोबतच सुमीतनं मुंबई पोलिसला टॅग केलं आहे. 

सुमीत या आधी आरे कारशेडवर केलेल्या त्याच्या ट्वीटमुळे चर्चेत होता. त्याने आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडला पाठिंबा दिला आहे. ‘कारशेड वही बनेगा’ हे सुमीतचं ट्वीट चर्चेचा विषय ठरला होता.