गडचिरोलीत पोलिसांना मोठे यश, पाच जहाल नक्षलींचे आत्मसमर्थन

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांपुढे पाच जहाल नक्षल्यांचे आव्हान होते.  

Updated: Dec 31, 2019, 09:01 PM IST
गडचिरोलीत पोलिसांना मोठे यश, पाच जहाल नक्षलींचे आत्मसमर्थन title=
Pic Courtesy : PTI

गडचिरोली : जिल्ह्यात पोलिसांपुढे पाच जहाल नक्षल्यांचे आव्हान होते. नक्षली गटाकडून नेहमीच हल्ला करण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. हे आव्हान आता संपुष्टात आले आहे. पाचही जहाल नक्षलींनी आत्मसमर्पन केले आहे. यात दोन पुरुष तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. या पाच नक्षलवाद्यांवर एकूण २७ लाखांचे होते बक्षीस लावण्यात आले होते. वर्षभरात नऊ नक्षलवादी ठार झाले असून २२ नक्षलींना अटक आणि ३४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पन केले आहे.

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली पोलिसांपुढे पाच जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका काहीही अघटित न घड़ता निर्विघ्नपणे पडल्या पार. गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० कमांडोंनी वर्षभरात राबविलेले यशस्वीपूर्ण नक्षलविरोधी अभियानामुळे  २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक या जिल्हयात कोठेही अनुचित घटना न घटनानिर्विघ्नपणे पार पाण्यात यश मिळविले. 

नक्षली कारवाईत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर राहीला. गडचिरोली पोलीस-नक्षलवादी यांच्यात २३ चकमकी झाल्यात. त्यामध्ये नऊ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. नक्षलवाद्यांनी घाततपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलले १४१.५०० किलोगॅम बजनाचे लेन्डमाईन्स, क्लेमोर माईन्स जप्त करण्यात आल्याने अनुचित प्रकार टाळण्यास गडचिरोली पोलीस दल यशस्वी ठरले. 
यावर्षी गडचिरोली पोलीस दलाने दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य असलेल्या जहाल नक्षलवादी असलेल्या नर्मदा 
आणि  तिचा पती राणी सत्यनारायना ऊर्फ किरण याच्यासहीत एकुण ७४ लाख बक्षीस जाहीर असलेल्या २२ नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश प्राप्त केले.