कोल्हापूर, सांगली : वंदेमातरमला विरोध करणाऱ्या समाजवादी नेते आबू आझमीचा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळा दहन आणि जोडे मारो आंदोलन केले.आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.
अबू अझमीच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. वंदेमातरम् म्हणण्यास नकार दर्शविल्याच्या निषेधार्थ आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात दहन करण्यात आला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी अझमीच्या पुतळ्याला कोल्हापुरी चप्पलांचा प्रसाद देत दहन करण्यात आले.
यावेळी 'इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा', 'अबू आझमी मुर्दाबाद' अशा जोरदार घोषणा देत अबू आझमी यांचा तीव्र निषेध करण्यात आला. आझमी यांनी पाकिस्तानातून सुपारी मिळाली असून त्यांनी आता देशविरोधी बोलणं थांबवावं अन्यथा त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शिवसेनेनं दिलाय.