आतिष भोईर, कल्याण : राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अजूनही वाढत असल्याने अशा जिल्ह्यांधमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीत देखील आता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास अशा व्यक्तींना थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे. उद्या पासून याची कडक अंबलबजावणी होणार आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची आता अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. सकाळच्या वेळेत अजूनही मोठी गर्दी होताना दिसत आहे. कठोर नियम करुन देखील नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.