राज्यात होळीच्या आधीच उकाडा वाढला

राज्यात उकाडा वाढू वाढला असून अनेक शहरात रविवारी पारा ३५शीच्या वर

Updated: Feb 17, 2020, 09:08 AM IST
राज्यात होळीच्या आधीच उकाडा वाढला title=

मुंबई : राज्यात उकाडा वाढू वाढलाय. अनेक शहरात रविवारी पारा ३५शीच्या वर पोहोचलाय. येत्या काही दिवसात कमाल तापमानाचा पारा चढा राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. साधारण होळीपर्यंत तापमान सामान्य राहतं.

तापमानात तफावत 

मात्र सध्या होळीच्या आधीच उकाडा वाढलाय. कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत पहायला मिळतेय. मुंबईत कमाल ३३.३ तर किमान १९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय.