मुंबई : राज्यातील जनतेसाठी चिंतेची बाब समोर येतेय. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा उसळी घेतोय. इथलं कोरोनाचं प्रमाण सरासरी १३ टक्क्यांवर गेलंय. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारचे नियम गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झालीय. राज्यात रविवारी 16 हजार 620 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अकोल्यात सर्वाधिक रुग्ण आढळतायत. त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणास नागपूर, वर्ध्यात जास्त रुग्ण आढळलेयत.
राज्यात करोना प्रसाराचा वेग वाढला असून बाधितांचे प्रमाण सरासरी 13 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आठवडाभरातील नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या 50 हजारांहून 90 हजारांच्या घरात पोहोचली आहे. सर्वाधिक वाढ अकोल्यात झाली असून त्याखालोखाल जळगाव, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा येथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शनिवारच्या तुलनेत दहा दिवसांनी कमी झालाय. रोज 10-12 दिवसांनी कमी होणारा हा काळ संसर्गवाढीच्या दृष्टीने नवे आव्हान घेऊन येणारा असल्याने चिंतेचं वातावरण वाढतंय... मुंबईत सध्या 13 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 176 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 31 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यात, तर 220 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्यात.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर वाढत असून सलग तिसऱ्या दिवशी रूग्णांची संख्या चारशे पार गेली आहे. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूचा दर वाढत असल्यानं कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. सध्या पालिका क्षेत्रात 3 हजार रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1214 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात गेल्या 24 तासात 537 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे. आत्तापर्यत 21 हजार 599 रुग्ण अकोल्यात आढळले आहेत. तर 402 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पुन्हा एकदा रुग्ण वाढीचा वाढता आकडा पाहाता अकोला प्रशासनाची चिंता वाढतेय.
औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वी चे क्लास आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 4 एप्रिल पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.
नागपुरात आजपासून 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणारेय. या काळात नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन घेण्यात आलाय. आजपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या अनुषंगानं शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. शहराच्या सीमा आजपासून सील करण्यात आल्यायत. शहरात विनाकारण फिऱणाऱ्यांविरोधात कारवाई होणारेय. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शनिवारच्या तुलनेत दहा दिवसांनी कमी झालाय... रोज 10-12 दिवसांनी कमी होणारा हा काळ संसर्गवाढीच्या दृष्टीने नवे आव्हान घेऊन येणारा असल्याने चिंतेचं वातावरण वाढतंय... मुंबईत सध्या 13 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 176दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 31 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यात, तर 220 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्यात.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर वाढत असून सलग तिसऱ्या दिवशी रूग्णांची संख्या चारशे पार गेली आहे. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूचा दर वाढत असल्यानं कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. सध्या पालिका क्षेत्रात 3 हजार रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1214 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.