एसटी संप : कर्मचाऱ्यांना अजित पवार यांचा स्पष्ट शब्दात हा इशारा

ST Employees strike :राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. काही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडी सरकारकडून वेळोवेळी आवाहन करुनही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत.  

Updated: Jan 29, 2022, 02:15 PM IST
एसटी संप : कर्मचाऱ्यांना अजित पवार यांचा स्पष्ट शब्दात हा इशारा  title=

पुणे : ST Employees strike :राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. काही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडी सरकारकडून वेळोवेळी आवाहन करुनही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. जे कर्मचारी सेवेवर हजर झाले नाहीत त्यांना एसटी महामंडळाकडून नोटीसही पाठविण्यात आली. तर काहींना निलंबित केले. काहींना बडतर्फ करण्यात आलेत. मात्र, अद्याप काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आता यापुढे फार काही होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.  (Ajit Pawar On ST Employees strike)

एसटी संपाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी शेवटचे आवाहन केलेले आहे.आता यापुढे फार काही होणार नाही. कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता विद्यार्थी आणि जनतेचा विचार करावा.  त्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील एसटी सुरु झाली पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीची बैठक झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आले. मात्र, अद्याप एसटी कर्मचारी रुजू झालेले नाहीत. तसेच संपात फूटही पडली तरही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, एसटी सुरु करुन प्रवाशांचे हाल थांबले पाहीजेत, असेच राज्य सरकारचे म्हणणे आहे. तरीही काही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने पुन्हा एकदा अजित पवार यांनी शेवटचा इशारा दिला आहे. यापुढे काहीही मिळणार नाही, असे स्पष्ट केले.