पिंपरी-चिंचवड : सॉफ्टवेअर इंजीनिअर ते मॉडेल आणि नंतर रुपेरी पडद्यावरची हिरॉईन. हर्षू कांबळे हिचा हा चढा प्रवास आहे. २ वर्षांपूर्वी हर्षू कांबळे पुण्यातल्या एका नामांकित कंपनीत आय टी इंजिनिअर म्हणून काम करत होती.
एका मित्रानं तिला सहज एका अॅडमध्ये काम करण्याची विचारणा केली, आणि तिथून हर्षू कांबळेचा ग्लॅमर विश्वाचा प्रवास सूरु झाला. अनेक अॅडमध्ये काम करत असतानाच तिनं अनेक सौंदर्य स्पर्धांतही भाग घेतला.
एशिया पॅसिफिक युनिकचा किताब पटकावलासिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत तिनं एशिया पॅसिफिक युनिकचा किताब पटकावला. आज ती सिंगापूरमध्ये मिस्टर अँड मिसेस इंडिया एशिया पॅसिफिकची डायरेक्टर आहे. याच दरम्यान हर्षूला एका वेब सिरीजमध्ये मूख्य भूमिकाही मिळाली. तर एका भोजपुरी चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.