नागपुरातल्या काही मंडळांनी जपली सामाजिक बांधिलकी

गणेशोत्सवात नागपुरातल्या काही मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचं दिसून येतंय.

Updated: Aug 28, 2017, 08:34 PM IST
नागपुरातल्या काही मंडळांनी जपली सामाजिक बांधिलकी title=

नागपूर : गणेशोत्सवात नागपुरातल्या काही मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचं दिसून येतंय. उत्सव साजरा करताना समाजातील दुर्लक्षित घटकांची गरज लक्षात घेत या मंडळांनी विविध उपक्रम राबवलेत. यापैकी आहे नागपूरचे राणी लक्ष्मी नगर गणेश उत्सव मंडळ.

या मंडळानं गेल्या वर्षी उत्सवाच्या निमित्तानं नोट-बुक आणि पेन दान करण्याचं भक्तांना आवाहन केलं होतं. भक्तांनी या आवाहनाला साद दिली आणि अश्या प्रकारे एकत्र झालेले नोटबुक आणि पेन या मंडळाने दुर्लक्षित विद्यार्थ्यांना वाटली. असाच उपक्रम यंदाही राबवण्याचा या मंडळाचा प्रयत्न आहे.