आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सुकन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा शनिवारी ९ डिसेंबरला साखरपुडा सोहळा पार पडला. तासगावमधील अंजनी गावात हा सोहळा झाला. या सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 10, 2017, 09:43 AM IST
आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न title=

सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सुकन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा शनिवारी ९ डिसेंबरला साखरपुडा सोहळा पार पडला. तासगावमधील अंजनी गावात हा सोहळा झाला. या सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. 

पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी स्मिताचा साखरपुडा झाला. येत्या १ मे २०१८ला स्मिता आणि आनंद लग्नाच्या बेडीत अडकतील.

या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी घेतल्याचं समजतंय.आनंद यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केलं असून ते पुण्यात व्यवसाय सांभाळतात. (फोटो सौजन्य - महापॉलिटिक्स डॉट कॉम आणि फेसबुक)