मावळमधून स्मिता पाटील नाही तर पार्थ पवार - सुनील तटकरे

पुण्यातील मावळमधून पार्थ पवार यांनाच मात्र, स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नाही.

Updated: Mar 6, 2019, 09:20 PM IST
मावळमधून स्मिता पाटील नाही तर पार्थ पवार - सुनील तटकरे title=
छाया : पार्थ पवार, स्मिता पाटील फेसबुक वॉल

मुंबई : पुण्यातील मावळमधून पार्थ पवार यांनाच निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, अशी माहिती राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी दिली. कुठल्याही पातळीवर युवती नेत्या स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नसल्याचाही निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत, असे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार सांगत असले तरी लोकसभेसाठी मावळमधून त्‍यांच्‍याच नावाचा विचार राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये अग्रक्रमाने सुरू असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे, असे सुनील तटकरे यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडताना आज स्‍पष्‍ट केले. 

पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवावी, असा तेथील कार्यकर्त्‍यांचा आग्रह असून याबाबत येत्‍या दोन चार दिवसात निर्णय होईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. मावळमधून दिवंगत आर. आर. पाटील यांच्‍या कन्‍या स्मिता पाटील यांच्‍या नावाची कुठलीही चर्चा पक्ष पातळीवर झालेली नाही, असेही सुनील तटकरे यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मदतानर संघातून कोण याची उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे.