Ambarnath Child Death: दुर्दैवी घटना! 6 महिन्याच्या चिमुकल्याचा घशात मासा अडकून मृत्यू

Ambarnath Child Death:  गुरुवारी संध्याकाळच्या सुमार शहाबाज हा घरात ऐकटाच खेळत होता. त्याच वेळेस शहाबाजच्या आईने घरांमध्ये खाण्यासाठी छोटया आकाराचे मासे आणले होते.

Updated: Nov 25, 2022, 07:54 PM IST
Ambarnath Child Death: दुर्दैवी घटना! 6 महिन्याच्या चिमुकल्याचा घशात मासा अडकून मृत्यू title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ: आपल्या सगळ्यांना मासे (fish) खायला आवडतात. आपण आवडीनं ते कुठल्या स्पेशल दिवशी आवर्जून मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत खातोही. परंतु मासे खाताना किंवा खायला देताना जर तुम्ही ही एक चूक केलीत तर ती तुमच्यासाठी व तुमच्या आप्तांसाठी फार महागात पडू शकते. सध्या असाच एक प्रकार अंबरनाथ येथे घडला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे सध्या सगळीकडेच भितीच आणि चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार ऐकून तुमचंही काळीज तुटून पडेल. हा प्रकार अंबरनाथ (ambarnath) येथे घडला आहे. लहान मुलाच्या गळ्यात मासा (fish news amabarnath) अडकून त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परंतु येथे घडलेला प्रकार खोडा विचित्रही आहे. या लहान माशाला कोणी खाण्यासाठी मासा दिला नसून या लहान बाळानं जिवंत मासा गिळला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. (Six Month Old Baby Dead due to Stuck Fish in his throat Amberanth News Marathi)

काय घडला प्रकार - 

अंबरनाथमधील (ambarnath news) उलन चाळ परिसरात घशात मासा अडकून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय. शहाबाज अन्सारी असं या चिमुकल्याचं नाव आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमार शहाबाज हा घरात ऐकटाच खेळत होता. त्याच वेळेस शहाबाजच्या आईने घरांमध्ये खाण्यासाठी छोटया आकाराचे मासे आणले होते. हे जिवंत मासे एका बाजूला घरामध्ये जमिनीवर ठेवले होते. मात्र आईची नजर चुकवत शहाबाज हा रांगत रांगत त्या मास्यांपर्यन्त पोहोचला आणि त्याने एक जिवंत मासा (alive fish) तोंडात घातला.

मात्र हा मासा शहाबाजच्या घशात जाऊन अडकला, त्यामुळे शहाबाज अस्वस्थ झाला. त्यानंतर शहाबाजच्या आईने आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी शहाबाजला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र श्वास गुदमरून शहाबाजचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा परासली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.  या प्रकारानं पुन्हा एकदा मुलांच्या काळजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का - 

चित्रपटांचा परिणाम हल्ली सर्वांवरच झालेला (Movies) पाहायला मिळतो. त्यामुळे अगदी लहान मुलं असो वा तरूण मुलं. त्यांच्यावर लहानपणापासूनच चित्रपटांचा (Children News) आणि टेलिव्हिजनचा फार मोठा प्रभाव (Television) असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात दाखवण्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे अनुकरणही (Copy) त्यांच्याकडून अनेकदा केले जाते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Pune) पुण्यात घडला आहे. कोवळ्या मुलांच्या आयुष्यात प्रेम ही फार संवेदनशील गोष्ट (Hadapsar Crime News) असते परंतु सध्या याच गोष्टींमुळे लहान मुलांच्या हातून गुन्हेही घडताना दिसत आहे. अशावेळी लहान मुलांवर लक्ष ठेवणंही पालकांसाठी महत्त्वाचं झालं आहे. 14 वर्षाच्या एका शाळकरी पोराने स्वतःच्या instagram खात्यावर असं काही स्टेटस ठेवले की सगळेच हादरून गेले. आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का असे स्टेटस (Instagram Status) ठेवले. या नंतर या मुलावर थेट गुन्हाच दाखल करण्यात आला. हडपसर पोलिसांनी या मुलावर विनयभंग व पोस्कोनुसार (Posco) गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.