कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : पुण्याच्या काही भागातून लोहगाव विमानतळावर जायचं म्हटलं तर किमान ४० ते ४५ मिनिटं लागतात. ट्रॅफीक असेल तर विचारता सोय नाही. पण पिंपरी चिंचवडच्या चऱ्हालीमधून अवघ्या पाच मिनिटांत लोहगाव विमानतळावर जाता येणार आहे. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनाही अर्ध्या तासाच्या आत लोहगाव विमानतळावर जाता येईल.
पिंपरी चिंचवडच्या चऱ्होली पासून लोहगाव अवघ्या सहा किलोमीटरवर आहे. पण या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता आत्तापर्यंत नव्हता. त्यामुळे चऱ्होली आणि परिसरातल्या नागरिकांना दिघी, विश्रांतवाडीमार्गे तब्बल २० किलोमीटरचा वळसा घालून लोहगाव विमानतळावर जायला लागायचे. पण आता पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने चऱ्होली ते लोहगाव या रस्त्याचे काम केलंय. त्यामुळे अवघ्या ५ मिनिटात चऱ्होली वरून विमानतळाला जाता येणार आहे.
या रस्त्यामुळे अगदी राजगुरूनगरपर्यंतच्या नागरिकांना फायदा होणार आहे. आळंदी, देहू, चाकण या भागातल्या नागरिकांचाही या मार्गामुळे फायदा होणार आहे