कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

कोल्हापूर महानगरपालिका नूतन महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड झाली आहे. 

Updated: May 25, 2018, 12:17 PM IST
कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे  title=

कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिका नूतन महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांचा 11 मतांनी केला पराभव केला आहे. शोभा बोंद्रे यांना 44 मते तर रुपाराणी निकम यांना 33 मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले यांनी घेतली माघार तसेच मतदानात सहभाग न घेता सोडलं सभागृह. शिवसेनेचे इतर तीन नगरसेवक ही गैरहजर होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हेच मताधिक्य मिळाल्यास उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश सावंत यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.