Uddhav Thackeray on Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले "माझा माणूस", नेमकं असं का म्हणाले?

Uddhav Thackeray on BJP: कसबा पोटनिवडणुकीतील (Kasba By Election) विजयानंतर भाजपाचा (BJP) त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान 'मातोश्री'वर (Matoshree) ही भेट झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली.   

Updated: Mar 8, 2023, 02:02 PM IST
Uddhav Thackeray on Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले "माझा माणूस", नेमकं असं का म्हणाले? title=

Uddhav Thackeray on BJP: कसबा पोटनिवडणुकीत (Kasba By Election) भाजपाचा (BJP) पराभव केल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजपाचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याच्या महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाचा बालेकिल्ला भुईसपाट करू शकतो हा आत्मविश्वास केवळ पुण्याला नाही तर देशाला दिला असल्याचं म्हटलं आहे. आता सगळे एकत्र आलो आहोत, पुढच्या निवडणुका अशाच एकत्र लढू असंही ते म्हणाले आहेत. 

कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान 'मातोश्री'वर (Matoshree) ही भेट झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपावर घणाघात केला. जनतेच्या हिताचे प्रश्न ऐरणीवर आणूच दिले जात नाही, वेगळाच विषय काढला जात आहे. अवकाळी शेकऱ्यांना मदतीचे केवळ आदेश देऊ नये तर अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसंच कांद्याचे आंदोलन पेटलेलेच आहेत, माझ्यावर घरीच बसतो अशी टीका करायचे, आता यांनी बांधावर जावे असंही ते म्हणाले.  

"धंगेकर पराक्रम गाजवून आले. ते पूर्वी पुण्याचे नगरसेवक होते. मला आनंद आहे की माझा माणूस आमदार झालाय. या निवडणुकीने दाखवले की आम्ही एकत्र होतो. एकत्रित लढलो तर काय होते हे दाखवून दिले. जॅार्ज फर्नांडीस यांच्या निवडणुकीची आठवण करून दिली आहे. आपण पुढल्या निवडणुका एकत्र लढवुयात," असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

"त्यांच्याबरोबर न जाणारे राजन साळवी किंवा अनिल परब यांच्यावर होणारी कारवाई हा बदल्याचा भाग नाही का? आरोप प्रत्यारोप करून हैराण करायचे, तरी बधले नाही तर लाळघोटेपणा करायचा आणि परत त्यांच्यासह बसायचे हेच ते करतात. आता मेघालयात काय केले," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.

'आम्ही काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले आहे. ज्या लोकांच्या मागे तुम्ही चौकशी लावली, ते तुमच्या पक्षात आले तर शुद्ध होतील का? जनतेच्या मताचा बुलडोजर तुमच्यावर चालवावा लागेल," असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिली. 

"वेगळे विषय काढून लोकांना भटकवलं जात आहे. त्यामुळे जनतेचे जीवन मरण्याचे प्रश्न बाजूला राहतात. तात्काळ पंचनामे ही सरकारी भाषा आहे. ते करावे लागतील, पण ती मदत पोहचते का हेदेखील पाहिलं पाहिजे. माझ्यावर घरून कारभार करतो असा आरोप करत होते. पण मदत पोहचली होती. आता तुम्ही बांधाबांधावर जाऊन पाहणी करणार का?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.