हिंगोली : जिल्हा आकाराने लहान असला तरी जिल्ह्यातले गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आलीय. शिवसेना आणि मनसेच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हाध्यक्षांना तडीपार करण्यात आलंय.
हिंगोली पोलीस अधिक्षकांनी ३९ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे सादर केले होते. २६ प्रकरणं निकाली काढण्यात आलीयत. हिंगोलीतून पाच जणांना २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलंय. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष लक्ष्मणराव बांगर, मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांच्यासह तिघांना २ वर्षांसाठी हिंगोली बंद करण्यात आलीय. सेनेच्या बांगर यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत.
मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, विनायक भिसे पप्पू चव्हाण आणि मंगल काळे अशा पाच जणांना २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलंय. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी मोठी कारवाई करण्यात आलीय. आणखीही असेच काही प्रस्ताव विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर आहेत. त्यामुळं आणखीही काही लोक हद्दपार होण्याची शक्यताय. शांततेसाठी ही कारवाई करण्यात आलीय.