हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, शिवसेना आमदारांचं नाव आलं समोर

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन उघड

Updated: Oct 22, 2019, 03:51 PM IST
हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, शिवसेना आमदारांचं नाव आलं समोर title=

कोल्हापूर : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन उघड झालं आहे. स्फोट झालेल्या पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांच नाव असल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

हुबळी रेल्वे स्थानकावर एका अज्ञात वस्तूचा स्फोट झाला होता. ज्यामध्ये एकजण जखमी झाला होता. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते कोल्हापूरचं होतं. अमरावती एक्स्प्रेस हुबळी स्थानकावर आल्यानंतर आरपीएफ जवानाला ती वस्तू संशयास्पद वाटली. त्याने तो डब्बा खोलण्याचा प्रयत्न केला असता त्याचा स्फोट झाला. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक हुबळीकडे रवाना झाले आहे.

या स्फोटानंतर जिल्ह्यात हायअलर्ट घोषित करण्यात आला असून या अँगलने देखील प्रकरणाची चौकशी सुरु आहे. शहरातील महत्त्वाची ठिकाणं, स्थानके यावरची सुरक्षा वाढण्यात आली आहे.