अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा- सूत्र

 अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Updated: Jan 4, 2020, 11:10 AM IST
अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा- सूत्र  title=

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पद काँग्रेसकडे जात असल्याने  शिवसेना नेते अब्दुल सत्तार नाराज आहेत. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपावला आहे. पण अनिल देसाई यांनी राजीनामा स्वीकारला नाही. जिथे माझा शब्द चालत नाही तिथे राहून काय फायदा ? असा प्रश्न सत्तार उपस्थित करत आहेत. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून काँग्रेसला शिवसेनेने शब्द दिला आहे. दुपारी २ वाजता मतदान होणार आहे. त्यामुळे सत्तारांनी राजीनामा दिल्यानंतर काय घडामोडी घडतात ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

सत्तार यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठवले आहे. या विषयी अर्जुन खोतकर यांच्याशी संवाद साधला असता मी तुमच्याशी थोड्यावेळाने या विषयावर बोलेन असे त्यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 

आम्ही नेहमी भेटतो, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी ही भेट असल्याचे खोतकर म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा अध्यक्ष होऊच द्यायचा नाही अशी भूमिका अब्दुल सत्तार ठाम आहेत. पण जिल्हाध्यक्ष पद हे काँग्रेसला द्यावे अशी शिवसेनेची भूमिका आहे. असे बंड करुन चालणार नाही. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात असे सत्तार यांना सांगण्यात आले आहे. तसेच सत्तार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. सत्तार जेव्हा शिवसेनेत गेले तेव्हा त्यांना कॅबिनेट पद मिळणार असे त्यांना सांगण्यात आले. पण त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. राज्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील त्यांनी नाराजी दिसत आहे. सत्तार नाराज झाली तर स्थानिक राजकारणात शिवसेनेला तोटा होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा झटका ठरणार आहे.