पंढरपूर : आम्ही अजेय आहोत असे देशभर सांगत फिरणाऱ्या भाजपा सरकारला पाच राज्यांनी आपली जागा दाखवल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरात लगावला आहे. मला जागा वाटपात स्वारस्य नाही मला कर्जमुक्त शेतकरी, राम मंदिर निर्माण हवंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. पंढरपूरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. भाजपा सरकारवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. जानेवारीपासून दुष्काळग्रस्त भागात फिरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी मी अयोध्येला गेलो होतो आणि त्यासाठीच पंढरपूरला आलोय असे ते म्हणाले. अनुभव नसलेल्या कंपन्यांना राफेलचे काम दिलं गेलं तर बंदुकांच्या गोळ्या बनवण्याचे कंत्राट महिला बचत गटांना द्या असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. पंढरपुरातील शिवसेनेच्या सभेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत. शिवसैनिकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी पंढरपूरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सेना नेते आदेश बांदेकर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या भाषणाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.
भाजपाने निवडणूकीसाठी राम मंदिराचा मुद्दा घेतला. राम मंदिरच्या मुद्द्यावरून गादी बळकावली मग आता मागे का हटता ? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केलाय. तसेच राम मंदिरावर प्रकरणावरून नितिश कुमारांवरही त्यांनी निशाणा साधला. नितिश कुमारांनी राम मंदिर प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही त्यांनी म्हटलंय.
कॉंग्रेस सरकार कॉंम्प्यूटरमध्ये घुसलं त्यानंतर लोकांनी कॉंग्रेसला लाथ मारली तुम्हीही तोच कित्ता गिरवताय असे उद्धव ठाकरेंनी भाजपाला म्हटलंय.
ज्यांनी ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलंय, त्यांचं वाकडं कर अशी मागणी विठुरायाच्या चरणी केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. भाजपा सरकारवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी मी अयोध्येला गेलो होतो आणि त्यासाठीच पंढरपूरला आलोय असे ते म्हणाले. अनुभव नसलेल्या कंपन्यांना राफेलचे काम दिलं गेलं तर बंदुकांच्या गोळ्या बनवण्याचे कंत्राट महिला बचत गटांना द्या असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. गोधनासाठी देशभरात हिंसा होतेय पण इथे गाई गुर तडफडून मरत आहेत हे वास्तव सांगत गोरक्षेसाठी पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.
कांदा प्रश्न कधी सोडवताय ? पीक वीमा कर्जाच काय ? शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफीचं काय ? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा या शेतकऱ्यासाठी आधार बनेल असेही त्यांनी म्हटलंय. माझा शेतकरी कर्जबाजारी आहे पण तो माल्ल्या किंवा नीरव मोदी नाही, असेही त्यांनी म्हटलंय. ज्यांनी ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलंय, त्यांचं वाकडं कर अशी मागणी विठुरायाच्या चरणी केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 'शिवसेना झिंदाबाद...', 'पहेले मंदिर फिर सरकार', अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली.