शिवसेनेचे मिशन मराठवाडा; उद्धव ठाकरे आक्रमक, दिले हे आदेश

Shiv Sena Mission Marathwada :  आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. 

Updated: Apr 30, 2022, 02:34 PM IST
शिवसेनेचे मिशन मराठवाडा; उद्धव ठाकरे आक्रमक, दिले हे आदेश title=

मुंबई : Shiv Sena Mission Marathwada : राज्यात राजकीय धुरळा उडताना दिसून येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झालेत. भोंगा विरुद्ध हनुमान चालीसाचा मुद्दा राज्यात पेटविण्यात मनसे यशस्वी झाली. आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.  शिवसेनेने आता मिशन मराठवाडा आखलं आहे. मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष द्या, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. खासदार, प्रवक्त्यांच्या बैठकीनंतर आज सर्व जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे ऑनलाईनच्या माध्यमातून  जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणारेत. यावेळी शिवसेनेचे इतर नेतेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेच्या मिशन मराठवाड्याची चर्चा सुरु झाली आहे. मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष द्या असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत.  खासदारांनी शिवसंपर्क अभियानाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर केला. त्यात मिशन मराठवाडा आखण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला करारा जबाब देण्यासाठी 8 जूनला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे.

 शिवसेनेचं ‘मिशन मराठवाडा’

- मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष द्या : उद्धव ठाकरेंचे आदेश 
- नवे संपर्क प्रमुख नेमले जाणार 
- पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष 
- नांदेड परभणी जालना काबिज करा
- खासदारांनी शिव संपर्क अभियानाचा अहवाल सादर  
- बैठकीत मराठवाडा विदर्भातील पक्ष वाढीवर चर्चा