शिदें गटाच्या माजी आमदाराचा पराक्रम; तलवारीने कापला केप

क्षीरसागर यांनी चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आहे.  याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Updated: Nov 26, 2022, 03:55 PM IST
शिदें गटाच्या माजी आमदाराचा पराक्रम; तलवारीने कापला  केप

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापुर : शिंदे गटाचे समर्थक तथा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर(Rajesh Kshirsagar) यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सध्या चर्चेत आहे. क्षीरसागर यांनी चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला(cut the birthday cake with a sword) आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

श्रीरसागर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले( Ravikiran Ingwale) यांनी केली आहे. याबाबत शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्षीरसागर यांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

घडलेला प्रकार बेकायदेशीर असून हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे शहर संपर्कप्रमुख रवीकरण इंगवले यांनी मागणी केली आहे.  दरम्यान, ही तलवार चांदीची असून संग्रहामध्ये असलेली तलवार आहे. त्यामुळे इंगवले यांनी केलेल्या तक्रारीला काही महत्त्व नसल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.