मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. शरद पवारांची तीसरी पिढी लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून राजकारणात डेब्यू करत आहे. कुटुंबाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांनी निवडणूकीच्या मैदानाचा त्याग केला आहे. सर्वात आधी पवारांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तिव्र इच्छा असल्यामुळे शरद पवारांनी माघार घेतली आहे.
त्यामुळे, आता महाराष्ट्रच्या मावळ मतदार संघातून शरद पवारांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पार्थ पवारांसाठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी निवडणूक लढणे योग्य नसल्याचे कारण सांगत त्यांनी हा त्याग केला आहे. सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि शरद पवार रिंगणात उतरले होते. त्यांच्या कुटुंबातील जास्त व्यक्ती निवडणूक लढवतील तर बाकी कार्यकर्ते कधी निवडणूक लढवतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले.
हाय प्रोफाइल मतदार संघ असलेल्या मावळमधून पार्थ पवार निवडणूक लढवणार आहेत. पार्थ पवार यांच्या विरूद्ध शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे निवडणूक लढवणार आहेत.
मावळ हाय प्रोफाइल मतदार संघातील वैशिष्ट्य
- मावळ लोकसभा मतदार संघात शहरी भाग मोठ्या प्रमाणावर आहे.
- प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सुध्दा याच भागात मोडतो.
- येथे देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट आहे.
- येथून मालवाहू जहाजांची वाहतूक होते.
- लोनावळा आणि खंडाळा अशी पर्यटक स्थळे या भागाला लाभली आहेत.
- मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा मुंबई - पुणे महामार्ग सुद्ध याच भागात येतो.