Sharad Pawar on BJP : भाजपविरोधात राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. अनेकवेळा आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मवाळ भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे गुणगाण गायले. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही भाजपसोबत जाणार का?
देशात भाजपविरोधात विविध राजकीय पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न होत आहे. दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील शरद पवार उपस्थित नव्हते. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांना 20,000 कोटी रुपये कोणी दिली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर मोठा वादंग झाला. तसेच अदानी प्रकरणी चौकशीसाठी काँग्रेसकडून जेपीसीची मागणी केली आहे. या मागणी योग्य नाही, असे सांगत शरद पवार यांनी खो घातला. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मागणी योग्य ठरले, अशी भूमिका पवार यांनी घेतली. तसेच पंतप्रधान मोदी यांचा डिग्रीचा विषय महत्त्वाचा नाही, असे म्हटले. तर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही मोदींपेक्षा दुसरे प्रश्न आहेत. मोदींचे काम चांगले आहे, असे म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असे संकेत आहेत, अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान, अजित पवार आजारी होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल बंद होता. त्यावरुनही अजित पवार नॉटरिचेबल असेही वृत्त आले. त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
भाजपबाबत राष्ट्रवादीची भूमिका समर्थन देणारी असल्याने राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्न शरद पवार यांना विचारला गेला. त्यांनी उत्तर देणयाचे टाळलं. भाजपसोबतच्या आघाडीवर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आता सांगता येणार नाही. महाविकास आघाडी सध्या तरी एकत्र असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. तसेच दिल्लीत झालेल्या राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होते. मात्र, मला इथे काही कामे होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, 1 मे या दिवशी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या रॅलीला शरद पवार यांनी संबोधित करावं, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पवार यांना केल्याची माहिती आहे. पवार या विनंतीला मान देत सभेला संबोधित करतील अशी शक्यता आहे. पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी उद्धव ठाकरेंनी भेट देत जवळपास सव्वातास चर्चा केली. मविआच्या सभा संभाजीनगरातून सुरु झाल्या. 16 एप्रिलला मविआची नागपुरात सभा होणार आहे. तर त्यानंतर 1 मे या दिवशी मुंबईत मविआची सभा होणार आहे.