कर्जत-जामखेडच्या तरूणानं भाजपची झोप उडवली - शरद पवार

शरद पवार नातवासाठी प्रचाराच्या मैदानात

Updated: Oct 19, 2019, 03:44 PM IST
कर्जत-जामखेडच्या तरूणानं भाजपची झोप उडवली - शरद पवार title=

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या नातवासाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांसाठी शरद पवारांनी सभा घेतली. कर्जत जामखेडच्या तरूणानं भाजपाची झोप उडवली आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. रोहितला निवडून दिलं तर पंतप्रधान कर्जत जामखेडचा विकास पाहायला येतील असं सांगत त्यांनी मतदारांना साद घातली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या आजोबा-नातवाची चांगलीच चर्चा आहे. साताऱ्यातल्या सभेत शरद पवारांनी पावसाची तमा न बाळगता भाषण केलं. आण त्यानंतर त्यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवारांनीही भरपावसात भाषण केल्याचं समोर आलं आहे. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. 

रोहित पवार भरपावसात ते विरोधकांवर बरसले. शरद पवार आणि रोहित पवार यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.