मतदानासाठी चिमुकल्यांचं अनोखं आवाहन

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 

Updated: Oct 19, 2019, 03:38 PM IST
मतदानासाठी चिमुकल्यांचं अनोखं आवाहन title=

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : सर्वत्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार आणि प्रसार सुरु आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदान करावे यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. पण बुलढाणा जिल्ह्यातील चिंचखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है....या गाण्याची आठवण करून देत हातावर मेहंदीने 'गो व्होट' लिहून अनोखा संदेश दिला आहे. 

अर्थातच मुठ्ठी मे है तकदीर हमारी असं हे चिमुकले मतदारांना सांगत आहेत. या आगळ्यावेगळ्या क्लुप्तीमुळे या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण समाजमाध्यमांवर हा चर्चेचा विषय झाला आहे. 

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी पात्र असणाऱ्या सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व पक्षातील नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. शेवटच्या दिवशी नेत्यांकडून जास्तीत जास्त सभा घेण्यात येत आहेत.