पवार म्हणतात, मी आलो की 'टाईट कॉलर'ही खाली होते

खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता शरद पवारांनी मिश्किल टीपण्णी केली.

Updated: May 11, 2018, 01:46 PM IST

सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना, खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता पवारांनी मिश्किल टीपण्णी केली. सातऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल नेहमीच युवकांमध्ये चर्चा असते, खास करून राजेंच्या स्टाईलबद्दल देखील तरूणांमध्ये आकर्षण असतं, चर्चा असते. उदयनराजेंची कॉलर टाईट करण्याच्या स्टाईलला देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. उदयनराजे देखील सार्वजनिक कार्यक्रमात शरद पवारांना आदर देताना दिसतात. पण पवारांनी चक्क उदयनराजेंची स्टाईल मारून दाखवली.

पवारांकडून उदयनराजेंची स्टाईल

मात्र, साताऱ्यात बुधवारी उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर या नेत्यांमध्ये गटबाजी आहे, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून विचारला त्यावर, शरद पवार म्हणाले, 'पक्षात काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सर्व ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. निवडणुकीवेळी सर्व सरळ होतात, तुम्ही बघाच. टाइट कॉलरही नंतर खाली होते,' असं सांगत पवारांनी उदयनराजेंच्याच स्टाइलमध्ये कॉलर टाइट केली आणि पुन्हा खाली केली.