NCP Candidate List: भोसरी ते सोलापूर आणि नागपूर ते परळी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2024, 03:16 PM IST
NCP Candidate List: भोसरी ते सोलापूर आणि नागपूर ते परळी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर title=

NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत या नावांची घोषणा केली. दरम्यान उर्वरित नावांची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या केली जाईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. ज्या जागांवर महाविकास आघाडीच्या दोघांना एबी फॉर्म दिले आहेत त्यासंदर्भात चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

1. करंजा - ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट - अतुल वांदिले
3. हिंगणा - रमेश बंग
4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
5. चिंचवड - राहुल कलाटे
6. भोसरी - अजित गव्हाणे
7. माजलगाव - मोहन बाजीराव जगताप  
8. परळी - राजेसाहेब देशमुख 
9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अणुशक्तीनगर येथून फहाद अहमद यांच्या नावाची घोषणा केल्याने तिथे नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक आणि त्यांच्यात लढत होईल हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांना अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  

फहाद राष्ट्रवादीकडून लढणार का? असं विचारण्यात आलं असता, मी आज राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यांचा पक्ष प्रवेश करूनच मी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान राष्ट्रवादीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 11 महिला आहेत. जयंत पाटील यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. "आमच्या यादीत 11 महिला होत आहेत याचा विशेष आनंद आहे. लाडकी बहीण म्हणून घोषणा करत नाही, तर कृतीशील कार्यक्रम केला आहे," असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. आमच्या मतदारसंघात ज्या जागा उपलब्ध झाल्या त्यात 11 महिला होत आहेत. यात आदिवासी, आरक्षितसह ओपन मधीलही आहेत असं जयंत पाटील म्हणाले. 

आज संध्याकाळी किंवा उद्या उमेदवारांची घोषणा करु असं जयंत पाटील यांनी सांगितलं. या यादीत अजून 7-8 नावं असतील अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.