प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या गोलिवडे या आजोळ गावी भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्याशी संभाषण साधताना गावकऱ्यांबद्दल एक तक्रार मांडली.
पूर्वीच्या काळी मामाच्या गावची मुलगी करायची पद्धत होती, पण तुम्हीही बघितलं नाही आणि माझ्याही लक्षात आलं नाही. पण आत्ता राहूदे, काय बोलायचं ५० वर्ष झाली आता, अशी मिश्किल टिप्पणी केली. पवारांच्या या टिप्पणी नंतर गावकऱ्यामधे हशा पिकला.
पहील्यांदाच गोलिवडे गावात आलेल्या पवारांचं ग्रामस्थांनी जंगी स्वागत केलं..संपूर्ण गावकऱ्यांनी फेटे बांधून आणि महिलांनी नववारी साडी अशा पारंपरिक पोशाखात शरद पवार यांच स्वागत केलं. या अनोख्या स्वागताने पवारही भारावून गेले. पवारांनी गावकऱ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
गावकऱ्याच्या प्रेमामुळ पवारच फक्त भारावले होते अस नाही तर गावकरी देखील आमचा भाचा गावात आल्याची प्रतिक्रिया देवुन पवार यांच्या बद्दल आदर व्यक्त केला. आजोळी भेट दिल्यामुळे समाधान वाटतय अशी प्रतिक्रिया नोंदवून गावकऱ्यांना पवारांनी मी तुमचा भाचा आहे याचीच प्रचिती दिली.