'मुंबईत काय काय घडतं, सगळं उघड केलं जाईल'

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी घणाघाती टीका केली आहे.

Updated: Oct 26, 2018, 08:10 PM IST
'मुंबईत काय काय घडतं, सगळं उघड केलं जाईल' title=

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी घणाघाती टीका केली आहे. यापूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमात खासदार शरद बनसोडे यांना 'बेवडा खासदार' म्हटलं होतं. यानंतर शरद बनसो़डे यांनी प्रणिती शिंदे यांना कडक शब्दात उत्तर दिलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने एकमेकांवर आरोपांची चिखलफेक वाढली आहे.

खासदार शरद बनसोडे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केलेले आरोप त्यांच्याच शब्दात... खाली वाचा...

आमदार प्रणिती शिंदे यांनी माझ्या पार्टीवर, माझ्या मोठ्या नेत्यावर, आणि दोन मंत्र्यांवर काही टिपण्णी केली, त्याच बरोबर त्यांनी मला सोलापूरचा बेवडा म्हटलं. आमदार प्रणितीताई या लोकप्रतिनिधी आहेत, मी पण एक लोकप्रतिनिधी आहे. 

भाषा ही थोडीशी जपून वापरावी लागते. मी दारू पिलेलं, काय तुमच्या समक्ष पिलोय. पिऊन कधी तुमच्या समक्ष आलोय. तुमच्या बद्दल तर खूप काही बोललं जातं.

संबंधित बातमी  दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, एक दमडी सुद्धा आणू शकले नाही - प्रणिती शिंदे

या प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. तुम्हाला जर आरोप करायचेच असतील, तर आमच्या कामाबद्दल करा. जनता ठरवेल काय करायचे ते. 

पण तुम्ही असे व्यक्तिगत आरोप पुन्हा कधी करू नका, मुंबईमध्ये काय काय घडतं, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, माहिती आहे, सगळं उघड केलं जाईल, तुम्हाला सोलापूरमध्ये येणं बंद होवून जाईल, त्यामुळे मी तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग देत आहे.