सांगली : सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून झालेल्या भीषण अपघात १० जण ठार तर १३ जण जखमी झालेत. मृतांमध्ये ५ स्त्रिया आणि ५ पुरुष आहेत.
हा ट्रक लादी घेऊन कर्नाटकमधून कराडला जात होता. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
एसटी बंद असल्याने कर्नाटकातून कराडमध्ये मजुरी करायला येण्यासाठी १९ ते २० मजूर या ट्रकने प्रवास करत होते. त्यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
#Visuals Maharashtra: 10 people, travelling in a truck carrying tiles, dead after the truck toppled in Sangli. pic.twitter.com/dwUvgpcCLk
— ANI (@ANI) October 21, 2017
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री संप मागे घेतला असला तरी एसटीची वाहतूक सुरळीत झालेली नाही. काल एसटी बंद असल्यामुळे खासगी ट्रकमधून कर्नाटकमधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.