२ रूपयांच्या पतंगासाठी अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या

पंतगाचा पाटलाग करत गेलेल्या १३ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळ येथील सूरज नगर परिसरातील सागवान जंगल परिसरात ही घटना घडली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 21, 2017, 09:04 AM IST
२ रूपयांच्या पतंगासाठी अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या title=

यवतमाळ : पंतगाचा पाटलाग करत गेलेल्या १३ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळ येथील सूरज नगर परिसरातील सागवान जंगल परिसरात ही घटना घडली.

अभिजीत टेकाम (वय-१३ वर्षे) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. अभिजीत हा आपल्या कुटुंबियांसह यवतमाळ शहरातील सुरज नगर परिसरात राहात होता. घरातून शिकवणीसाठी म्हणून बाहेर परडलेला अभिजीत १३ ऑक्टोबर पासून बेपत्ता होता. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्यामुळे पालकांनी शोधाशोध केली. त्याचे मित्र, नातेवाईक आणि शिकवणीच्या ठिकाणीही त्याच्या पालकांनी विचारपूस केली. मात्र, त्याची काहीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अभिजीतचे वडील दीपक टेकाम यांनी यवतमाळच्या वडगावरोड पोलिसात अपहरणाबाबत तक्रार दाखल केली. 

दरम्यान, एखाद्या मुलाचे शहरातून अचानक असे गायब होणे पोलिसांसाठीही चक्राऊन टाकणारे होते. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता. दरम्यान, यवतमाळ शहरातील सूरज नगर परिसरातील सागवान जंगल परिसरात एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचलेला अभिजितचा छिन्नविच्छिन्न पाहून पोलिसांनाही धक्का बसला. अभिजितला इतक्या क्रूरपने कोणी मारले असेल, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
दरम्यान, ज्या दिवशी अभिजीतच्या हत्येची घटना घडली त्या दिवशी तो उडत आलेल्या पतंगाचा पाठलाग करत तिथे घटनास्थळावर गेला होता. त्यावेळी तिथे पूर्वीपासून बसून असलेल्या अल्पवीयन तीन मुलांशी त्याचा वाद झाला. या वादातून अल्पवयीन आरोपींनी अभिजीतची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी कसून केलेल्या तपासात पुढे आली आहे.

अल्पवयीन मुले व्यसनाच्या जाळ्यात

पोलिसांनी अभिजीतच्या हत्याप्रकरणात १५० हून अधिक मुलांची चौकशी केली. यात वयाने अल्पवयीन असलेली अनेक मुले व्यसनाच्या अहारी गेलेली आढळून आली. अभिजीतचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी पोलिसांना फेविकॉल एसआर ९८८ मोठ्या प्रमाणावर सापडले होते.