सातवीत शिकणाऱ्या मुलीसोबत 5 महिन्यांपासून तिघांचे वाईट कृत्य; सात जणांना जेलची हवा

  sexually abusing a girl for five months at Jalgaon : चीड आणणारी आणि संपापजनक बातमी. सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी गेल्या 5 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

Updated: May 15, 2022, 04:08 PM IST
सातवीत शिकणाऱ्या मुलीसोबत 5 महिन्यांपासून तिघांचे वाईट कृत्य; सात जणांना जेलची हवा title=

जळगाव :  sexually abusing a girl for five months at Jalgaon : चीड आणणारी आणि संपापजनक बातमी. सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी गेल्या 5 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. या घटनेतील तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करणाऱ्यात आलेल्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आली आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.  पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणाच्या सोबत ओळख होती.  याच ओळखीचा फायदा घेत या तरुणाने गावाबाहेर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. 

या घटनेनंतर ही काही दिवसांनी त्याने तिच्यावर अत्याचार करणे सुरुच ठेवले होते. या घटनेबाबत त्याने आपल्या दोन मित्रांना सुद्धा तो करत असलेल्या प्रकारची माहिती दिली होती. त्यानंतर तेही त्याच्यावर नजर ठेऊन होते. तसेच अश्लील दृश्य पाहून दोघा तरुणांनी आपण गावात बोभाटा करु, अशी धमकी देत या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. 

गेल्या पाच महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुली वर वारंवार अत्याचार करत होते. काल रात्री नऊ वाजता मुलगी घराच्या बाहेरुन अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यानंतर आई वडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. त्यानंतर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. 

या घटनेत पीडित मुलगी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली.  त्यांच्या विरोधात पोक्सो, अट्रोसिटी कायदा आणि बलात्कारचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी माहिती दिली. 

 या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन पीडितेची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई पोलिसांनी करावी अशी मंगणीही त्यांनी यावेळी केली आहे.