पाहा राज्यात कोठे किती कोरोना रूग्ण

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. 

Updated: Feb 22, 2021, 09:41 PM IST
पाहा राज्यात कोठे किती कोरोना रूग्ण title=

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे काही जिल्ह्यात लॉक डाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 6 पासून ते 1 मार्च सकाळी 8 पर्यंत नवीन आदेश कायम राहतील.

मुंबईत ७६१ नवे रूग्ण, ४ मृत्यू
पुणे मनपा - 336, १ मृत्यू
नागपूर-मनपा 643- एकही मृत्यू नाही
अमरावती मनपा 555 , एकूण ७ रुग्ण दगावले
अकोला मनपा 167
नाशिक मनपा 127- २ मृत्यू
औरंगाबाद मनपा 194
कल्याण डोंबिवली मनपा 134
नवी मुंबई- मनपा 108
ठाणे मनपा 132
जालना  137 रुग्ण
जळगाव  137 रुग्ण

 

जालन्यात देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाच्या 137 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 14 हजार 665 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 13 हजार 732 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या 549 रुग्णांवर उपचार सुरु आहे. 

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 14 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्ण 23 हजार 382 आहेत. त्यापैकी 22 हजार 849 रूग्ण कोरोनामुक्त झाले आसून 136  रूग्णांवर उपचार सुरू आहे. 

वाशिम जिल्ह्यात आज नवे 62 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मागील सहा दिवसांत 496 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 835 एकूण पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण 537 आहेत.