शाळेबाबत मोठी बातमी । पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार

Maharashtra School Reopening News : पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत.  

Updated: Nov 17, 2021, 07:39 AM IST
शाळेबाबत मोठी बातमी । पहिलीपासूनच्या शाळा सुरु होणार title=
संग्रहित छाया

मुंबई : Maharashtra School Reopening News : पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होणार आहे. (School Reopening News Maharashtra to reopen schools for classes 1 to 12)

ग्रामीण भागांसह शहरांतील पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.