मुंबई : School News : देशात गेल्या दोन दिवसांत कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 47,092 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 509 जणांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांत नोंदली गेलेली सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यात डेल्टाचे रुग्ण अधिक दिसून येत आहे. भविष्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यानुसार आता प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक (School Health Clinic) उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
राज्यात शाळा बंद आहेत. मात्र, त्या कधी सुरु होणार याची अनिश्चितता आहे. आता शाळा सुरू करण्यासाठी शिक्षम विभागाची तयारी सुरू आहे. त्यानुसार राज्याच्या शिक्षण विभागाची (Maharashtra Education Department) सुधारित नियमावली करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक (School Health Clinic) उभारा, अशी सूचना राज्य टास्क फोर्सकडून (Maharashtra Task Force) शिक्षण विभागाला केली आहे. अनेक सूचनापैकी ही महत्वाची सूचना आहे. (Health Clinic in every school in Maharashtra)
या सूचनेनुसार शाळा सुरू कऱण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. राज्यातील शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नाही मात्र शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यानुसार सीएसआर निधीचा वापर करून राज्यातील प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक (School Health Clinic)उभे केले जाणार आहे. विविध प्राथमिक उपचारांवरील औषधेही शाळेत उपलब्ध असणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठी राज्य टास्क फोर्सने शालेय शिक्षण विभागाला अनेक सूचना केल्या आहेत. ( School Based Health Clinic )