औरंगाबादेत कोरोना संकटाबरोबर 'सारी'चा आजार, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू

 औरंगाबादेत गेल्या दहा दिवसात सारी या आजारामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Apr 9, 2020, 03:33 PM IST
औरंगाबादेत कोरोना संकटाबरोबर 'सारी'चा आजार, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू title=

औरंगाबाद : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे औरंगाबादेत गेल्या दहा दिवसात सारी या आजारामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजाराची लक्षणे ही कोरोनाच्या लक्षनासारखी असतात ,या १० लोकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र सारी या आजारांनी त्यांनी जीव गमावला आहे.

 शहरात मंगळवारपर्यंत  सारी आजाराचे ९७ रुग्ण आढळले होते. सारी आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी ताप येतो आणि तापाचे प्रमाण जास्त असते. शिवाय अशक्तपणा खूप येतो. निमोनिया आणि श्‍वसनाचा त्रास होतो. छातीत सुद्धा दुखायला लागते, त्यामुळे नागरिकांनी आता याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकार मेडिकल स्टाफला पुरवीत असलेल्या पर्सनल प्रोटेकशन किट किती निकृष्ट आहेत याचा पुरावाच मेडिकल स्टाफने उघड केला आहे त्यांना पुरवले साधन कसे आहेत. हे त्यांनी मीडिया समोर उघड केले आहे. अशाच निकृष्ट समानांमुळे आमच्या एक सहकार्याला कोरोना झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं हा आमच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप नर्सिंग संघटनेने केला आहे. याबाबत औरंगाबाद महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या कार्यध्यक्ष इंदुमती थोरात यांनी माहिती दिली.