मालमत्ता जप्तीनंतर संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान

Shiv Sena leader Sanjay Raut's property : कष्टाच्या पैशातून संपत्ती घेतली होती. ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. आज ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. 

Updated: Apr 5, 2022, 03:43 PM IST
मालमत्ता जप्तीनंतर संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान title=
PIC courtesy / ANI

नवी दिल्ली : Shiv Sena leader Sanjay Raut's property : कष्टाच्या पैशातून संपत्ती घेतली होती. ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. आज ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे. कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. एक रुपया जरी गैरव्यवहारात सापला तर ही मालमत्ता मी भाजपला दान करेन, असे थेट आव्हान राऊत यांनी दिलेय. (Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut's property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case)

संजय राऊत म्हणाले, आमचं राहतं घर जप्त केले आहे. त्यावर भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके वाजवत आहेत. मराठी माणसाचे हक्काचे राहते घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असेच करत राहिले पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते.  असत्यमेव जयते!!, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हे लोक आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.

आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. अशा कारवाया केल्या म्हणून हा संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावे लागेल, असे म्हटले होते, असे राऊत जप्तीनंतर माहिती देताना म्हटले.

दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासात झालेल्या अनियमिततेशी संबंधित प्रकरणात ED ने PMLA च्या तरतुदींनुसार एकूण 11,15,56,573 रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. संलग्न मालमत्ता ही गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे माजी संचालक प्रवीण एम राऊत यांच्या पालघर, सफाळे, पडगा, येथे असलेल्या जमिनीच्या स्वरुपात आहेत.

तसेच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांनी संयुक्तपणे अलिबाग येथील किहीम समुद्रकिनारी असणारा भूखंड ईडीने जप्त केला आहे.