Samriddhi Highway Accident: रविवार सकाळची सुरुवात एका सुन्न करणाऱ्या बातमीने होतेय. संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रव्हलर बस धडकल्याचे समोर आले आहे. रात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रक जात होता. त्याला आरटीओने तपासणी साठी थांबवले. ट्रक रस्त्याच्या बाजूला असताना मागून येणारी बस ट्रॅव्हलर ट्रकवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रॅव्हलरच्या समोरच्या भागाचा अपघातात चक्काचूर झाला.. त्यात समोर बसलेल्या लोकांचा जागीच मृत्यू झाला.. 5 वर्षाची तनुश्री आईच्या मांडीवर पुढं बसली होती तिचाही जागीच मृत्यू झाला. ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या बसला स्पीड नियंत्रित झाली नाही आणि त्यामुळं अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे.
यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कळली आहे. हे सगळे लोक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. मृत्यू झालेल्यामध्ये चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. जखमी वर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका अपघात कसा झाला, याची चौकशी सुरु आहे. समृद्धी महामार्गावर पोलिसांनी ट्रक थांबवला. दरम्यान ट्रक बाजुला घेत असताना मागून भरधाव वेगाने येणारी बस ट्रकवर आदळल्याचे वृत्त समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2023
20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही फडणवीस म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आणि दुर्दैवी आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. तसंच या अपघातात 20 ते 22 जण जखमी असून ते लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना आणि मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2023
तसंच या अपघातात 20 ते 22 जण जखमी असून ते लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.