Samruddhi Mahamarg : अरे बापरे ... समृद्धी महामार्गावर 10 दिवसांत 29 अपघात, एकाचा मृत्यू तर 33 जखमी

Mumbai Nagpur expressway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांच्या मालिका घडत आहेत. 

Updated: Dec 22, 2022, 12:55 PM IST
Samruddhi Mahamarg : अरे बापरे ... समृद्धी महामार्गावर 10 दिवसांत 29 अपघात, एकाचा मृत्यू तर 33 जखमी  title=
Mumbai Nagpur expressway

Mumbai Nagpur expressway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांच्या मालिका घडत आहेत. दहा दिवसांत 29 अपघात घडलेत. या अपघातात एकाचा मृत्यू आणि 33 जण जखमी झालेत. पहिल्या तीन दिवसांत दोन रस्ते अपघात झाले होते. आता या मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे पुढे आले आहेत. बेदरकारपणे वाहन चालविण्याच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट 

दरम्यान, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) शिर्डी ते नागपूरपर्यंत (Samruddhi Mahamarg ) खुला झाला आहे. मात्र, हा महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटनांमुळे चिंतेत भर पडली. त्यामुळे मृद्धी हायवेवर स्पीड लिमिट निश्चित करण्यात आले आहे. आता यापुढे स्पीड लिमिट मोडले तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. असे असताना गाड्यांचा स्पीड कमी झालेला नाही, हेच अपघातावरुन दिसून येत आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघनातही वाढ 

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून 11 ते 21 डिसेंबर या कालावधीत एकूण 29 रस्ते अपघात झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. तर 33 जण जखमी झाले. शिवाय विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनही वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य शासनाला अपयशच आलेय. यापैकी वेगमर्यादेचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. आतापर्यंत 67 प्रकरणे दाखल झाली आहेत.

समृद्धी महामार्गामुळे शिर्डी ते नागपूर या दोन शहरातील अंतरही पाच तासात पूर्ण करता येणार आहे.  महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास 80 किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास 120 किलोमीटरची वेगमर्यादा आहे. मात्र पहिल्या तीन दिवसांत दोन रस्ते अपघात झाले होते. बुलडाणा जिल्ह्यात नऊ आणि जालना जिल्ह्यात आठ अपघातांची नोंद झाली आहे.

वेग मर्यादेचे उल्लंघन होतेय

समृद्धी हायवेवर वेग मर्यादेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आले आहे. (Mumbai Nagpur expressway speed limit) त्यामुळे अपघाताला आळा बसणार आहे. समृद्धी महामार्ग हा गाड्या दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील हे  लक्षात ठेऊन बांधण्यात आला होता. पण महामार्ग सुरु झाल्यापासून अपघात आणि टायर फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही वेगमर्यादा आता ताशी 120 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

 समृद्धी महामार्गावर वाहतूक नियम उल्लंघनातही वाढ होताना दिसत आहे.  एकूण 125 प्रकरणे वाहतूक नियम उल्लंघनाची आहेत. तर दहा दिवसात नियम उल्लंघनाची 29 प्रकरणे होती. त्यानंतर यात आणखी वाढ होत गेली आहे. गेल्या दहा दिवसांत वेगाचे उल्लंघन होताना दिसत आहे. तसेच अनधिकृतरीत्या वाहने उभी करणे यांसह अन्य नियम उल्लंघनाच्या 56 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांकडून एकूण 1 लाख 63 हजार 400 रुपये दंडही आकारण्यात आला.